वर्सोव्यात १०४ पिशव्या रक्त संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST2021-04-20T04:07:22+5:302021-04-20T04:07:22+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्याची रक्ताची गरज पाहून शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ...

104 bags of blood collected in Versova | वर्सोव्यात १०४ पिशव्या रक्त संकलन

वर्सोव्यात १०४ पिशव्या रक्त संकलन

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र राज्याची रक्ताची गरज पाहून शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार शिवसेना शाखा क्र. ५९ च्या वतीने आणि सीडब्लूसीचे प्राचार्य अजय कौल यांच्या एकता मंचच्या सहकार्याने वर्साेवा येथे नुकतेच रक्तदान शिबिर संपन्न झाले.

सीडब्लूसी शाळेच्या हॉलमध्ये संपन्न झालेल्या सदर शिबिरात १०७ जणांनी आपला सहभाग नोंदवला व १०४ रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या.

शिवसैनिकांचे व रक्तदात्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी वर्सोवा विधानसभा संघटक शैलेश फणसे, उद्यान व बाजार समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे, उप विभागप्रमुख राजेश शेट्ये, महिला उप विभागसंघटक जागृती भानजी, शाखाप्रमुख सतीश परब, महिला शाखा संघटक बेबी पाटील, सीडब्लूसीचे ॲक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत काशिद आदी या वेळी उपस्थित होते.

-------------------------------------------

Web Title: 104 bags of blood collected in Versova