Join us  

गोरेगाव परिसरात २४ तास खडखडाट; जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 9:46 AM

गोरेगाव पूर्वेला पश्चिम द्रुतगती मार्गावरील परिसरात सध्या असलेली ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई पालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव पूर्व मधील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट येथील जलवाहिनी बदलण्यासाठी येत्या मंगळवारी २३ एप्रिलला सकाळी १० ते बुधवारी २४ एप्रिलला सकाळी १०, असा २४ तासांसाठी १०० टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

गोरेगाव पूर्वेला पश्चिम द्रुतगती मार्गावरील परिसरात सध्या असलेली ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. हे काम पालिकेकडून मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम पुढील किमान २४ तास सुरू राहणार असल्याने या दरम्यान या परिसरातील काही भागांत १०० पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

या भागाला बसणार फटका-

१) पी दक्षिण विभाग : वीटभट्टी, कोयना वसाहत, स्कॉटर्स वसाहत, कामा इंडस्ट्रीयल इस्टेट, रोहिदास नगर व शर्मा इस्टेट (२३ एप्रिल)

२) पी पूर्व विभाग : दत्त मंदिर मार्ग, दफ्तरी मार्ग, खोत कुवा मार्ग, खोत डोंगरी, मकरानी पाडा आणि हाजी बापू मार्ग, तानाजी नगर, कुरार गांव, रहेजा संकुल, साईबाबा मंदिर, वसंत व्हॅली, कोयना वसाहत (२३ एप्रिल)

३) आर दक्षिण विभाग : बाणडोंगरी, कांदिवली (पूर्व) (२३ एप्रिल)

४) पी दक्षिण विभाग : पांडुरंगवाडी, गोकूळधाम, जयप्रकाश नगर, नाईकवाडी, गोगटेवाडी, कन्यापाडा, कोयना वसाहत, आय.बी. पटेल मार्ग, यशोधाम, संतोष नगर, विश्वेश्वर मार्ग, प्रवासी इंडस्ट्रीयल इस्टेट, राजीव गांधी नगर, आरे मार्ग, श्रेयस वसाहत इत्यादी (२४ एप्रिल)

५) पी पूर्व विभाग : पिंपरीपाडा, पालनगर, संजयनगर, एम.एच.बी. वसाहत, इस्लामिया बाजार, जानू कम्पाउंड, शांताराम तलाव, ओमकार लेआउट, चित्रावणी, स्वप्नापूर्ती, घरकुल, गोकूळधाम, यशोधाम, सुचिताधाम, दिंडोशी डेपो, ए. के. वैद्य मार्ग, राणी सती मार्ग (२४ एप्रिल)

टॅग्स :मुंबई महानगरपालिकागोरेगावपाणी