जव्हारमध्ये १०० टक्के बंद
By Admin | Updated: February 22, 2015 22:39 IST2015-02-22T22:39:04+5:302015-02-22T22:39:04+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिष्ट पक्ष तसेच सर्व डावया संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली.

जव्हारमध्ये १०० टक्के बंद
जव्हार : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिष्ट पक्ष तसेच सर्व डावया संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. बंदला जव्हार मध्ये १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, रिपब्लिकन पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील पाठींबा दिला होता.
जव्हार येथील माकपाचे ज्येष्ठ नेते व जि. प. सदस्य रतन बुधर यांनी कॉ. पानसरे यांच्यावर झालेला हल्ला व त्यात झालेला त्यांचा मृत्यू ही पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असून या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश व्यतीथ झाला असून विचारांवर झालेल्या या हल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
कॉ. पानसरे यांना लाल सलाम, कॉ. पानसरे अमर रहे, त्यांचे विचार अमर राहतीलच परंतु भाजपा सरकार व महाराष्ट्र पोलीसांचा धिक्कार केला. कॉ. रतन बुधर यांनी क्रॉ. पानसरे यांना श्रद्धांजली अपर्ण करताना त्यांच्या विवेकवादी विचाराचा वारसा पुढे आपण सर्वांनी पुढे चालवायचा असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले. (वार्ताहर)