सी-लिंक आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १०० टक्के फास्टॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:31 IST2021-02-05T04:31:49+5:302021-02-05T04:31:49+5:30

मुंबई : वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतू आणि यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल नाक्यांवरील सर्व मार्गिकांवर २६ जानेवारीपासून ...

100% Fastag on C-Link and Mumbai-Pune Expressway | सी-लिंक आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १०० टक्के फास्टॅग

सी-लिंक आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १०० टक्के फास्टॅग

मुंबई : वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतू आणि यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल नाक्यांवरील सर्व मार्गिकांवर २६ जानेवारीपासून फास्टॅग प्रणालीची १०० टक्के अंमलबजावणी होणार आहे.

फास्टॅग वापरणाऱ्या वाहनांची संख्या वाढण्यासाठी एमएसआरडीसीने ११ जानेवारीपासून सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार, जीप व एसयूव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला पाच टक्के कॅशबॅक देण्यात सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मि‌ळाला. २६ जानेवारीपासून वांद्रे-वरळी सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीने सज्ज असतील. या दोन्ही मार्गाच्या टोल नाक्यांवर आजपासून फास्टॅगधारक वाहनांना प्राधान्य राहील. मर्यादित कालावधीसाठी काही लेन हायब्रीड लेन असतील. त्या लेनमध्ये फास्टॅग नसलेले वाहनधारक रोख रकमेचा भरणा करू शकतात. पण त्यांना टोल नाक्याजवळील स्टॉलवरून फास्टॅग विकत घेऊन गाडीवर लावावा लागेल, असे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले. फास्टॅग मार्गिकेमध्ये विनाफास्टॅग अथवा ब्लॅकलिस्टेड टॅग असलेल्या वाहनांनी प्रवेश केल्यास दुप्पट टोल भरावा लागेल.

Web Title: 100% Fastag on C-Link and Mumbai-Pune Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.