१०० दिवसांची बहुतांश कामगिरी उचलेगिरीची!
By Admin | Updated: February 8, 2015 01:45 IST2015-02-08T01:45:13+5:302015-02-08T01:45:13+5:30
शंभर दिवसांमधील ‘कामगिरीह्ण असल्याचे भाजपाप्रणीत सरकारने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत दाखवण्यात आले आहे.

१०० दिवसांची बहुतांश कामगिरी उचलेगिरीची!
श्रेय लाटले: टेलिमेडिसिनला राजाश्रय तर ठाकरे स्मारक समितीवरच थांबले
मुंबई : राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने सुरु केलेल्या अनेक योजना या आपली शंभर दिवसांमधील ‘कामगिरीह्ण असल्याचे भाजपाप्रणीत सरकारने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत दाखवण्यात आले आहे.
टेलीमेडीसीनची योजना शिवसेनेने स्वबळावर राबवण्याचा निर्धार केला. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले नव्हते. मात्र या योजनेचा आता सरकारने आपल्या पुस्तिकेत समावेश करून या योजनेला राजश्रय मिळवून दिला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरिता सहा जागांची शिफारस केली असली तरी प्रत्यक्षात याकरिता समिती स्थापन केली असल्याचेच पुस्तिकेत नमूद केले आहे.
आघाडी सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त भागात सिमेंट बंधारे बांधण्याची योजना राबवली होती. ही योजना हे सरकारही राबवणार असून, गेल्या १०० दिवसांतील सरकारची उपलब्धी दाखवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी स्मारक व इंदू मिलच्या जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे दोन्ही निर्णय आघाडी सरकारने घेतले होते. अर्थात त्याला पूर्णत्वाला नेण्यात सरकारला यश आले नसले तरी भाजपा सरकारने हे निर्णय आपल्या पुस्तिकेत समाविष्ट केले.
पोलिसांच्या बदल्यांचे विकेंद्रीकरण न्यायालयाच्या आदेशामुळे आघाडी सरकारने केले. वेगवेगळ््या श्रेणीच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार विकेंद्रीत करण्यात आले.
विद्यमान सरकारने पोलिसांच्या बदल्यांचे विकेंद्रीकरण हा
आपला निर्णय असल्याचे नमूद केले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पात पहिल्या टप्प्याच्या उभारणीचे काम आघाडी सरकारने सुरु केले.
हा प्रकल्प हेही आपले यश असल्याचे पुस्तिकेत स्पष्ट केले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने जीपीएसद्वारे धान्य ट्रकचे ट्रॅकींग करण्याची पद्धत आघाडी सरकारमध्ये सुरु झाली होती. त्याचेही श्रेय पुस्तिकेत घेण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)