ज्वेलर्सकडून हॉटेलच्या रूमचे १०० दिवसांचे भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:07 IST2021-03-25T04:07:07+5:302021-03-25T04:07:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाझेने मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये १०० दिवसांसाठी ५-स्टार हॉटेलमध्ये रूम बुक केली होती, ...

100 days hotel room rent from jewelers | ज्वेलर्सकडून हॉटेलच्या रूमचे १०० दिवसांचे भाडे

ज्वेलर्सकडून हॉटेलच्या रूमचे १०० दिवसांचे भाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाझेने मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये १०० दिवसांसाठी ५-स्टार हॉटेलमध्ये रूम बुक केली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्याचे भाडे एका सराफा व्यावसायिकाने भरले, उसने स्वरूपात ही रक्कम घेतल्याचे या व्यावसायिकाचे म्हणणे आहे. आर्थिक मदत करणारा झवेरी बाजारमधील हा मोठा सराफा व्यावसायिक आहे. त्याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याची माहिती आता समोर आली आहे.

* उपायुक्तांकडून घेतली माहिती

वाझेशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या सराफा व्यावसायिकाविरुद्ध मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत गुन्हे दाखल आहेत. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी या विभागाचे उपायुक्त पराग मनोरे यांना कार्यालयात बोलावले होते. त्यांच्याकडून सर्व संबंधित माहिती घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: 100 days hotel room rent from jewelers