वडाळ्यातील स्काय 31 मध्ये 100 कोटींचा घोटाळा, बी.पी.गंगर कन्स्ट्रक्शनविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु
By मनीषा म्हात्रे | Updated: November 6, 2025 19:31 IST2025-11-06T19:30:33+5:302025-11-06T19:31:20+5:30
आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष 11 च्या बँकिंग - 3 विभागाकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, सन 2018 ते आजपर्यंत ही फसवणूक झाली आहे.

वडाळ्यातील स्काय 31 मध्ये 100 कोटींचा घोटाळा, बी.पी.गंगर कन्स्ट्रक्शनविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु
मनीषा म्हात्रे
मुंबई : वडाळा येथील स्काय - 31 मध्ये 102 सदनिकाधारकांकडुन 100 कोटींची रक्कम उकळून विकासक कंपनी तसेच पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकच फ्लॅट दोघांना उकळून त्या रक्कमेवर देखील डल्ला मारला. याप्रकरणी बी.पी.गंगर कन्स्ट्रक्शनसह सुब्बरामन आनंद विलयनुर, उमा सुब्बरामन यांच्या विरुद्ध 100 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष 11 च्या बँकिंग - 3 विभागाकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार,
सन 2018 ते आजपर्यंत ही फसवणूक झाली आहे. कांदिवलीतील रहिवाशी सीए अनिल मोहनलाल द्रोण (62) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीनी आपापसात संगनमत करून वडाळा पश्चिमेकडील कात्रक रोडवरील स्काय 31 या इमारतीत 102 सदनिकाधारकांकडुन सन 2018 पासुन आजपर्यत सदनिका खरेदीची अंदाजे 100 कोटी रुपये रक्कम उकळली. घेतलेल्या रक्कमेचा स्काय 31 ही इमारत बांधण्यासाठी पुर्णपणे वापर न करता त्यापैकी काही रक्कम स्वतःच्या फायदयासाठी स्वतःच्या खात्यावर तसेच त्यांच्याशी संबधीत असलेल्या कंपन्यांचे खात्यावर वळती करून रकमेचा अपहार केला. तसेच सदर इमारतीतील एकच सदनिकेची दोघांना विक्री करून दोघांकडूनही पैसे घेवून त्यांचीही आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर गुन्हा नोंदवत तपास सुरु करण्यात आला आहे.