बलात्कार प्रकरणी बोगस डॉक्टरला दहा वर्षांची शिक्षा

By Admin | Updated: March 15, 2015 00:08 IST2015-03-15T00:08:35+5:302015-03-15T00:08:35+5:30

डॉक्टर असल्याचे भासवत मूल होण्यासाठी उपचार करण्याच्या बहाण्याने एका विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या भांडुप येथील नदीम शेखला विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली़

10 years of education for bogus doctor in rape case | बलात्कार प्रकरणी बोगस डॉक्टरला दहा वर्षांची शिक्षा

बलात्कार प्रकरणी बोगस डॉक्टरला दहा वर्षांची शिक्षा

मुंबई : डॉक्टर असल्याचे भासवत मूल होण्यासाठी उपचार करण्याच्या बहाण्याने एका विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या भांडुप येथील नदीम शेखला विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली़
ही घटना २००५ मध्ये घडली़ तेथील एका महिलेला मूल होत नसल्याने तिला शेखकडे उपचार घेण्याचा सल्ला एका नातलगाने दिला़ त्या वेळी शेखने आपण डॉक्टर असल्याचा गाजावाजा भांडुपमध्ये केला होता़ प्रत्यक्षात तो एका रुग्णालयात सफाईचे काम करायचा़
पीडित महिला उपचारासाठी आल्यावर तो तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करायचा़ याचे त्याने मोबाइलमध्ये चित्रणही केले होते़ ही बाब महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तिला मोबाइलमधील चित्रण दाखवून ही बाब कोणालाही सांगू नकोस, असे धमकावले़ याचा फायदा घेत त्याने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला़ अखेर तो या महिलेला त्याच्या मित्रांसोबत जाण्यासाठी भाग पाडत होता़ त्यामुळे त्या महिलेने हा प्रकार पतीला सांगितला़ त्यानुसार पतीने याचा गुन्हा नोंदवला़ त्या वेळी शेख डॉक्टर नसल्याचेही स्पष्ट झाले़ हा खटला विशेष न्यायालयात चालला़
पीडित महिला विवाहित असल्याने शेखने याचा गैरफायदा घेतला़ त्यामुळे शेखला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील कल्पना हिरे यांनी न्यायालयाकडे केली़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने शेखला दहा वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला़ दंडाची रक्कम महिलेला द्यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे़

Web Title: 10 years of education for bogus doctor in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.