दहिसर येथे दहा वर्षीय मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: January 7, 2015 00:16 IST2015-01-07T00:16:53+5:302015-01-07T00:16:53+5:30

एका १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी ३२ वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे.

10-year-old girl raped in Dahisar | दहिसर येथे दहा वर्षीय मुलीवर बलात्कार

दहिसर येथे दहा वर्षीय मुलीवर बलात्कार

दहिसर : एका १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी ३२ वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे.
शशी सालीयन असे आरोपीचे नाव असून तो दहिसर घरटनपाडा परिसरात राहतो. बाहुली घेण्यासाठी पैसे देतो, असे सांगून आरोपीने २४ डिसेंबरला पीडित मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर २५ डिसेंबरला घरच्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून दहिसर पोलिसांनी २६ डिसेंबरला आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)

 

Web Title: 10-year-old girl raped in Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.