Join us  

आंगणेवाडी जत्रेसाठी मध्य रेल्वेच्या १० विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 1:48 AM

आंगणेवाडीची जत्रा २५ फेब्रुवारीला आहे. जत्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने आंगणेवाडीला जातात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून आंगणेवाडी जत्रेसाठी विशेष १० जादा गाड्या सोडण्यात येतील.

मुंबई : आंगणेवाडीची जत्रा २५ फेब्रुवारीला आहे. जत्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने आंगणेवाडीला जातात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून आंगणेवाडी जत्रेसाठी विशेष १० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

सीएसएमटी ते करमळी दोन विशेष गाड्या सोडण्यात येतील. गाडी क्रमांक ०११५७ सीएसएमटीहून २३, २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम या स्थानकांवर थांबेल. या गाडीच्या डब्यांची संरचना एक एसी ३ टायर, ४ स्लीपर श्रेणी, ६ द्वितीय श्रेणी, ६ सामान्य श्रेणी अशी आहे.करमळी ते सीएसएमटी सुपरफास्ट दोन विशेष गाड्या असणार आहेत. गाडी क्रमांक ०२००६ विशेष गाडी करमळीहून २३, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी सुटेल. ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर या स्थानकावर थांबेल. या गाडीच्या डब्यांची संरचना एक एसी ३ टायर, ४ स्लीपर श्रेणी, ६ द्वितीय श्रेणी, ६ सामान्य श्रेणी अशी आहे.

पुणे ते सावंतवाडी रोड ते पुणे यादरम्यान अशा दोन विशेष गाड्या चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ०१४३१ विशेष गाडी पुण्याहून २५ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. तर दुसरी गाडी ०१४३२ विशेष गाडी सावंतवाडीहून २७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटेल. ही गाडी लोणावळा, कर्जत, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबेल. या गाडीची संरचना एक एसी २ टायर, पाच एसी ३ टायर, आठ स्लीपर श्रेणी, सहा सामान्य श्रेणी अशी आहे.

सावंतवाडी रोड ते पनवेल ते सावंतवाडी रोड अशा दोन विशेष गाड्या चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ०११६० विशेष गाडी सावंतवाडी रोडहून २६ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशा दोन विशेष गाड्या धावतील. गाडी क्रमांक ०११६१ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून २५ फेब्रुुवारीच्या मध्यरात्री १.१० मिनिटांनी सुटेल. गाडी क्रमांक ०११६२ विशेष गाडी सावंतवाडी रोडहून २५ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबेल. या गाडीच्या डब्यांची संरचना एक एसी २ टायर, दोन एसी ३ टायर, आठ स्लीपर क्लास आणि ६ सामान्य श्रेणी अशी आहे.पनवेलहूनही सुविधा उपलब्धगाडी क्रमांक ०११५९ विशेष गाडी पनवेलहून २६ फेब्रुवारीला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा या स्थानकांवर थांबेल. या गाडीच्या डब्यांची संरचना एक एसी २ टायर, पाच एसी ३ टायर, ८ स्लीपर श्रेणी आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी अशी आहे.

टॅग्स :रेल्वे