मुंबईत १० टक्के पाणी कपात
By Admin | Updated: January 10, 2015 02:04 IST2015-01-10T02:04:47+5:302015-01-10T02:04:47+5:30
१३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार असल्याने या काळात संपुर्ण मुंबईत १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

मुंबईत १० टक्के पाणी कपात
मुंबई : तानसा जलवाहिनीच्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार असल्याने या काळात संपुर्ण मुंबईत १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या नगरबाहय विभागात ठाणे येथील पडवळनगरमधील पंचपरमेश्वरलगत १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पश्चिम) जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून हाती घेणार आहे. हे काम १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ण होईल. हे काम पूर्ण करण्यासाठी ५२ तास अपेक्षित आहे. या काळात मुंबईतल्या पाणीपुरवठ्यात १३ जानेवारीच्या सकाळी ११ पासून १५ जानेवारीच्या दुपारी ३ वाजेपर्यंत १० टक्के पाणी कपात आहे. शहर विभागातील थेट पाणीपुरवठा होत असलेल्या इमारतींमध्ये दाब कमी असल्यामुळे तेथही परिणाम जाणवेल. (प्रतिनिधी)