हत्या अन् १० घरफोड्यांतून १० लाखांची कमाई
By Admin | Updated: March 4, 2015 01:26 IST2015-03-04T01:26:01+5:302015-03-04T01:26:01+5:30
हत्या करणाऱ्या शिकलगार टोळीकडून १३ गुन्ह्यांची उकल झाला आहे. विविध ठिकाणी टाकलेल्या दरोड्यातील १० लाख ७७ हजार रुपये किमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला.

हत्या अन् १० घरफोड्यांतून १० लाखांची कमाई
नवी मुंबई : घरफोडीच्या प्रयत्नात ज्येष्ठ नागरिकाची हत्या करणाऱ्या शिकलगार टोळीकडून १३ गुन्ह्यांची उकल झाला आहे. विविध ठिकाणी टाकलेल्या दरोड्यातील १० लाख ७७ हजार रुपये किमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला.
वाशी सेक्टर -१६ येथे राहणाऱ्या रमणलाल सेठ यांची १० जानेवारी रोजी हत्या झाली होती. त्यांच्या घरी घरफोडी करणाऱ्या टोळीला त्यांनी विरोध केल्याने त्यांच्यावर हल्ला झालेला. या घटनेनंतर काहीच दिवसात गुन्हे शाखा पोलिसांनी शिकलगार टोळीला अटक केली होती. एकाच कुटुंबातील व्यक्तीच्या या टोळीवर यापूर्वी मोक्का देखील लागलेला आहे. तर जामिनावर असतानाही ही टोळी ठिकठिकाणी घरफोड्या करत होती.
गुन्हा केल्यानंतर ही टोळी कारने शहराबाहेर पळ काढायची. त्यामुळे अद्यापपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. अखेर सेठ यांच्या हत्येनंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन नाशिक येथून अटक केलेली आहे. हत्येच्या तपासानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, अधिकराव पोळ यांच्या पथकाने त्यांच्याकडे घरफोडीच्या गुन्ह्यांसंबंधी चौकशीला सुरुवात केली. त्यामध्ये या टोळीने नवी मुंबई परिसरातील १८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यापैकी १३ गुन्ह्यांंची उकल झाल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.
रबाळे, तुर्भे, वाशी तसेच एनआरआय पोलीस ठाण्यातील हे गुन्हे आहेत. ही टोळी घरफोडीमध्ये चोरलेला सोन्या-चांदीचा ऐवज बुलढाणा येथील संदीप शहाणे (४६) या सोनाराला विकायची. त्यानुसार या टोळीने विकलेला ८ लाख ७७ हजार रुपये किमतीचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे. त्यानुसार या टोळीकडून एकूण १० लाख ७७ हजार रुपय् किमतीचा ऐवज जप्त केला असल्याचे मेंगडे यांनी सांगितले.
या टोळीकडून उकल झालेल्या १३ गुन्ह्यांमध्ये १ हत्या, २ कारचोरी व १० घरफोडींच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
गुन्ह्यानंतर शहराबाहेर पळ
च्सराईत गुन्हेगार सुरजितकौर कलानी (६०) हिच्यासह तिची मुले हिम्मतसिंग कलानी (३३), गुजरातसिंग कलानी (३७) आणि सहकारी संजीवन गमरे (२३) यांचा या टोळीत समावेश होता. गुन्हा केल्यानंतर ही टोळी कारने शहराबाहेर पळ काढायची. त्यामुळे अद्यापपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते.