१ हजार ३६ सिलिंडर्स जप्त
By Admin | Updated: October 28, 2015 00:12 IST2015-10-28T00:12:03+5:302015-10-28T00:12:03+5:30
कुर्ला पश्चिमेकडील ‘सिटी किनारा हॉटेल’ दुर्घटनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरांतील नियम धाब्यावर बसविणाऱ्या उपाहारगृहांवरील महापालिकेची धडक कारवाई सुरूच आहे

१ हजार ३६ सिलिंडर्स जप्त
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील ‘सिटी किनारा हॉटेल’ दुर्घटनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरांतील नियम धाब्यावर बसविणाऱ्या उपाहारगृहांवरील महापालिकेची धडक कारवाई सुरूच आहे. २४ विभागांत आजवर करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १ हजार ३६ अनधिकृत सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत.
महापालिकेद्वारे या तपासणीदरम्यान अनधिकृत सिलिंडर्सचा साठादेखील जप्त करण्यात येत आहे. १९ ते २७ आॅक्टोबरदरम्यान विशेष चमूद्वारे ही कारवाई करण्यात आली. महापालिका क्षेत्रातील अनेक उपाहारगृहांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक सिलिंडर्स अनधिकृतरीत्या ठेवण्यात आल्याचे आढळले. हे सर्व अनधिकृत सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार सर्वाधिक म्हणजे ११४ अनधिकृत सिलिंडर्स आर/दक्षिण विभागाच्या चमूद्वारे जप्त करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)