Join us

उपनगरी रेल्वे मार्गावर एकाच दिवशी ११ प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 01:40 IST

वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या ४ मृत्यूंपैकी दोघांचा धावत्या लोकलचा धक्का लागून मृत्यू झाला. तर एकाचा गाडीतून पडून मृत्यू झाला.

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावर १० सप्टेंबर रोजी ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, कल्याण आणि हार्बरवर एकूण ७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, वसई विभागात ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. अशा प्रकारे एकूण ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यातील २ प्रवाशांची ओळख पटलेली नाही.

वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या ४ मृत्यूंपैकी दोघांचा धावत्या लोकलचा धक्का लागून मृत्यू झाला. तर एकाचा गाडीतून पडून मृत्यू झाला. अन्य एकाचा जळलेला मृतदेह आढळला. सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात दोन आणि वाशी, ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका प्रवाशाचा नैसर्गिक मृत्यू झाला. तर वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गाडीतून पडून एकाचा, कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे रूळ ओलांडताना एका प्रवाशाचा व डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात धावत्या लोकलचा धक्का लागून एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

टॅग्स :लोकल