Join us

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत, पालकमंत्री लोढा यांनी घेतली पीडितांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 23:04 IST

Mumbai News:मुंबईतील आरे कॉलनीमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याबाबत तात्काळ सूचना देत मदत पोचवण्याचे आदेश दिले.  

मुंबई - मुंबईतीलआरे कॉलनीमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याबाबत तात्काळ सूचना देत मदत पोचवण्याचे आदेश दिले.  येत्या १० दिवसात संबंधित कुटुंबीयांना मदत पोचवण्याचे आदेश लोढा यांनी दिले आहेत. याबाबत मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, पुढच्या आठ दहा दिवसांमध्ये वनखात्याकडून पीडित कुटुंबीयांच्या खात्यामध्ये १० लाख रुपयांचा धनादेश जमा होणार आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आर्थिक मदत हा मदतीचा एक भाग आहे, त्यामुळे मृत्यूचे दु:ख आणि त्यामुळे झालेली हानी भरून येणारी नाही. त्यामुळे भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

टॅग्स :मुंबईमंगलप्रभात लोढाआरेबिबट्या