Join us  

तिसऱ्या फेरीसाठी 1 लाख 9 हजार जागा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 8:00 AM

अकरावी प्रवेश : दुसऱ्या विशेष फेरीत १८,७७४ प्रवेश

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीच्या नोंदणीला सुरुवात झाली असून, या फेरीसाठी विद्यार्थ्यांना मुंबई विभागातून प्रवेशासाठी १ लाख ९ हजार ४९२ जागा उपलब्ध होणार आहेत. दुसऱ्या विशेष फेरीमध्ये २६ हजार विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली होती त्यापैकी १८,७७४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या १४ हजार ९३९ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते. २३ सप्टेंबर रोजी तिसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.  

दुसऱ्या फेरीमध्ये बहुतांश महाविद्यालयांचे कट ऑफ वाढले. नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ ८० टक्क्यांच्या वर स्थिरावल्याने त्याखालील गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे धाकधूक वाढली आहे. दरम्यान, यंदा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी होणार नसल्याने विद्यार्थ्यांसाठी आणखी एका विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असून, ही फेरी अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी असणार आहे. 

अकरावी प्रवेशाची सद्य:स्थिती शाखा     कॅप प्रवेश     राखीव कोटा  एकूण प्रवेश कला     १९६६०    ५००९     २४६६९वाणिज्य     ९७९७०    ३३५०९    १३१४७९विज्ञान     ६६१८७    २१२७६    ८७४६३एचएसव्हीसी     २१९३    ३१८    २५११एकूण     १८६०१०    ६०११२    २४६१२२ 

शाखा     दुसऱ्या फेरीसाठी       दुसऱ्या फेरीमध्ये     तिसऱ्या फेरीसाठी          दिलेल्या जागा    झालेले प्रवेश    उपलब्ध जागाकला     २००५    १६१७    १८९३२वाणिज्य     १५७४९    ११२३९    ६०६३९ विज्ञान     ७९४८    ५६१८    २७६९३एचएसव्हीसी     ३३५    २९०    २२२८एकूण     २६०३७    १८७७४    १०९४९२

टॅग्स :महाविद्यालयविद्यार्थी