म्हाडाच्या घरांसाठी १ लाख ४९,४८१ अर्ज

By Admin | Updated: May 19, 2015 02:03 IST2015-05-19T02:03:01+5:302015-05-19T02:03:01+5:30

म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठी सोमवारी ६ वाजेपर्यंत १ लाख ४९ हजार ४८१ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी ९६ हजार १३६ अर्जदारांनी आपली अनामत रक्कम अ‍ॅक्सिस बँकेत जमा केली आहे.

1 lakh 49, 481 applications for MHADA houses | म्हाडाच्या घरांसाठी १ लाख ४९,४८१ अर्ज

म्हाडाच्या घरांसाठी १ लाख ४९,४८१ अर्ज

मुंबई : म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठी सोमवारी ६ वाजेपर्यंत १ लाख ४९ हजार ४८१ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी ९६ हजार १३६ अर्जदारांनी आपली अनामत रक्कम अ‍ॅक्सिस बँकेत जमा केली आहे. तर उर्वरित अर्जदारांकरिता अनामत रक्कम जमा करण्यासाठीचा कालावधी २० मे दुपारी ३.३० वाजेपर्यंत आहे.
म्हाडाची घरेही खासगी विकासकांप्रमाणे महाग असल्याची टिका होत असली तरी प्रत्यक्षात आतापर्यंत म्हाडाच्या सोडतीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी रात्री ७ वाजेपर्यंत १ लाख २७ हजार ३५८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ५९ हजार ७८९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. आता त्यात आणखी वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 1 lakh 49, 481 applications for MHADA houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.