महाडजवळ अपघातात १ ठार; १८ जखमी

By Admin | Updated: July 19, 2014 00:57 IST2014-07-19T00:57:41+5:302014-07-19T00:57:41+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर शहरानजीकच्या गांधारपाले येथील वळणावर एसटी बस आणि खाजगी लक्झरीची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात

1 killed in road accident in Mahad; 18 injured | महाडजवळ अपघातात १ ठार; १८ जखमी

महाडजवळ अपघातात १ ठार; १८ जखमी

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर शहरानजीकच्या गांधारपाले येथील वळणावर एसटी बस आणि खाजगी लक्झरीची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एसटी बसमधील १८ प्रवासी जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी ८.३० वा. झाला.
गोरेगाव ते महाड ही राज्य परिवहन महामंडळाची बस गांधारपाले गावच्या हद्दीत आली असता गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसची टक्कर झाली. यावेळी एसटी बसमधील चालक सुरेंद्र बाबाराव पाटील यांच्यासह वाहक आकाश नटे, रसिका खानविलकर, श्वेता निकम, हरिश्चंद्र भोनकर, सुवर्णा निकम, राज महाडिक, चंद्रकांत पिंगळे, आकाश खैरे, कामिनी भागवत, समीर गोवीलकर, नवीन जैन, इकसार डावरे, स्वप्नाली आडसुळ, विशाल पाटणे, अवधूत पावले, सिध्देश म्हाप्रळकर, तसलीम सनगे, दिलीप शिरोडकर (बसचालक) हे जखमी झाले. जखमींपैकी सुवर्णा निकमची प्रकृती गंभीर आहे. तिला जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: 1 killed in road accident in Mahad; 18 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.