मालाडमधून १ किलो ८०० ग्रॅम चरस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:07 IST2021-02-13T04:07:13+5:302021-02-13T04:07:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चरस विक्रीसाठी आलेल्या सराईत आरोपीच्या साथीदाराकडून गुरुवारी १ किलो ८०० ग्रॅम चरस जप्त करण्यात ...

मालाडमधून १ किलो ८०० ग्रॅम चरस जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चरस विक्रीसाठी आलेल्या सराईत आरोपीच्या साथीदाराकडून गुरुवारी १ किलो ८०० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. सूरज विजयबहादूर यादव ऊर्फ पोट्या (२१) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ला मालाड येथील शंकरराव साळवी मैदानात किसन गौड ऊर्फ साठे हा त्याच्या साथीदारासह संशयास्पद फिरताना दिसला. पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेताच साठेने पळ काढला. झोपडपट्टीतील चिंचोळ्या गल्ल्यांचा फायदा घेऊन ताे पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याचा साथीदार पोट्या पोलिसांच्या हाती लागला.
याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोट्या याच्या अंगझडतीत पोलिसांना १ किलो ८०० ग्रॅम चरस सापडले. त्याची किंमत ५७ लाख ६० हजार इतकी आहे. तो आप्पा पाडा परिसरात राहणार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
...................................