Join us  

मुंबई विमानतळार १ कोटींचे सोने जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई

By मनोज गडनीस | Published: April 18, 2024 5:40 PM

आखाती देशातून आलेल्या एका विमानातून आलेल्या मोहम्मद अनिस युनुस लोहिया या प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली.

मुंबई - गेल्या १६ व १७ एप्रिल या दोन दिवसांत मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने दोन स्वतंत्र प्रकरणात एकूण १ किलो ६८० ग्रॅम सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ९ लाख रुपये इतकी आहे.

प्राप्त माहितीनुसार, परदेशातून मुंबईत सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता. आखाती देशातून आलेल्या एका विमानातून आलेल्या मोहम्मद अनिस युनुस लोहिया या प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. या चौकशी दरम्यान त्याने शरीरात सोन्याची पेस्ट लपविल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्याच्या शरीरातून ६३ लाख ८९ हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे. तर, दुसऱ्या प्रकरणात मारीया अली हुसेन या महिला प्रवाशाने परिधान केलेले ४५ लाख ६४ हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीसोनं