Join us

मुंबई विमानतळावर पडकले १ कोटी ६० लाखांचे सोने

By मनोज गडनीस | Updated: March 5, 2024 18:02 IST

आतापर्यंत २५ पेक्षा जास्त आयफोन सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहेत.

मनोज गडनीस, मुंबई - गेल्या तीन दिवसात दहा स्वतंत्र प्रकरणात मिळून मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण १ कोटी ६० लाख रुपयांचे सोने पकडले आहे. या सोन्याचे वजन ३ किलो ३ ग्रॅम असून याचसोबत २ आयफोन देखील जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी व मार्च महिन्यात मिळून आतापर्यंत २५ पेक्षा जास्त आयफोन सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहेत.

दुबई, सिंगापूर, सौदी अरेबिया, फुकेट येथून आलेल्या काही परदेशी व भारतीय प्रवाशांकडून हे सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. यापैकी फुकेटमधून  येणाऱ्या एका विमानातील तस्करीचे प्रकरण इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. त्या प्रवाशाने हे सोने विमानातील सीटच्या खाली ठेवले होते. तर, अन्य प्रकरणात जे सोने आढळून आले ते प्रामुख्याने बिस्कीटांच्या पाकीटात, परिधान केलेल्या कपड्यांमध्ये, बॅगतेली कपड्यात, रुमालात, ट्रॉली बॅगेत बनावट कप्पे तयार करत ते लपविल्याचे तपासादरम्यान अधिकाऱ्यांना आढळून आले.

टॅग्स :विमानतळसोनं