Join us  

मुंबई विमानतळावर १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 10:15 AM

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर गुरुवारी मध्यरात्री सीआयएसएफच्या उपनिरीक्षक अनिता या इंटरनॅशनल सिक्युरिटी होल्ड एरियाच्या फ्रिस्किंग पॉइंटवर तैनात होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  मुंबईविमानतळावरून शारजाह येथे जाणाऱ्या तीन महिलांकडून गुरुवारी १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. 

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर गुरुवारी मध्यरात्री सीआयएसएफच्या उपनिरीक्षक अनिता या इंटरनॅशनल सिक्युरिटी होल्ड एरियाच्या फ्रिस्किंग पॉइंटवर तैनात होत्या. यावेळी त्यांना तीन महिला प्रवाशांच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यांची तपासणी केली असता त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांत लपवलेले अमेरिकन डॉलर्स आणि यूएई दिरहम आढळले. खवला एल्हादी अहमद आमरा, रागा नाउथ मोहम्मद तौम आणि रफिया एलहुसेन अब्दुल्ला अहमद अशी त्यांची नावे असून या महिला सुदानच्या नागरिक आहेत. त्या एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक जी९-४०६ ने शारजाहला जाणार होत्या. या प्रकरणाची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

बॅगमध्येही लपवले डॉलर्सयावेळी कॉन्स्टेबल सुशीला यांनी या महिलांकडील हँडबॅगची सखोल तपासणी केली असता त्यात आणखी काही अमेरिकन डॉलर्स लपवले होते. महिलांच्या ताब्यातून एकूण १,७२,२०० यूएस डॉलर्स व ९,७०० दिरहम असे १,२९,२४,७२० रुपये किमतीचे परकीय चलन जप्त केले. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीविमानतळ