शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खड्ड्यांचा धोका सांगण्यासाठी मडगावात यमराज रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 8:29 PM

सध्या गोव्यातील रस्ते खड्डेमय झाले असताना हा प्रश्न अगदी उच्च न्यायालयात पोहोचलेला आहे.

मडगाव: सध्या गोव्यातील रस्ते खड्डेमय झाले असताना हा प्रश्न अगदी उच्च न्यायालयात पोहोचलेला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी मडगावच्या शॅडो कौन्सिल या संघटनेने मडगावच्या मुख्य रस्त्यावर आ वासलेल्या यमराजाच्या तोंडाचे पोस्टर लावून हे रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत, हे दर्शविण्यासाठी प्रातिनिधिक आंदोलन केले. मडगावच्या मुख्य चौकावर चार ठिकाणी असे पोस्टर लावल्याने वाहन चालकांचेही लक्ष त्याकडे जाऊ लागले आहे.यासंदर्भात माहिती देताना शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो म्हणाले, मडगावचे रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही अभियंत्यांना घेरावही घातला तरीही रस्त्याची दुरुस्ती हाती न घेतल्याने आता लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे यमराजाचे पोस्टर रस्त्यावर लावले आहेत. निदान आता तरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष या ज्वलंत समस्येकडे जाईल अशी आम्हाला आशा आहे.मडगाव शहरातील मुख्य रस्ता, राष्ट्रीय हमरस्ता असून एका वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र त्यानंतर पहिल्याच पावसात रस्त्याचे डांबर वाहून गेल्याने संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून या रस्त्याची डागडुजी त्वरित हाती घेतली जाईल असे आश्र्वासन यापूर्वी सरकारने दिले होते. मात्र हे आश्र्वासन देऊन पंधरवडा उलटला तरीही रस्ते दुरुस्त होत नसल्याबद्दल आता नागरीक रस्त्यावर उतरले आहेत.या आंदोलनाबद्दल बोलताना कुतिन्हो म्हणाले, वास्तविक कुठल्याही रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर तीन वर्षे त्या रस्त्याची देखभाल त्या कंत्रटदाराकडून करणो बंधनकारक आहे. मात्र आजवर सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता खराब झाल्यानंतर सरकारी तिजोरीतून या दुरुस्तीवर पैसा खर्च करत असे. मात्र यावेळी आम्ही करदात्यांचा पैसा असा वाया घालवू देणार नाहीत. या रस्त्यांची दुरुस्ती डांबरीकरण केलेल्या कंत्रटदाराच्या पैशांतूनच केली जावी अशी आमची मागणी असून या डांबरीकरणासाठी सरकारी पैसा खर्च केला तर सार्वजनिक बांधकाम खात्याला आम्ही न्यायालयात खेचू अशा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शॅडो कौन्सिलच्या राधा कवळेकर, लॉरेल आंब्राचिस, फेलिक्स फर्नाडिस व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.