लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'आम्ही येतोय, तयार रहा, उजो उजो' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर करत आरजी पक्षाचे नेते मनोज परब यांनी त्यांच्या विरोधकांना इशारा दिला आहे. त्यामुळे लवकरच मोठी खळबळ उडण्याची शक्यता असल्याचा कयास लावला जात आहे.
पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर मनोज यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. तर दुसरीकडे त्यांनी बोरकर किंवा त्यांच्या समर्थकांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र 'उजो पेटणार' असे स्पष्ट झाले आहे.
सध्या मनोज परब तसेच त्यांच्या समर्थनात असलेले आरजी पक्षाचे नेते अजय खोलकर व विश्वेश नाईक यांच्याकडून सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करुन पक्ष बोरकर व त्यांच्या समर्थकांना प्रतित्युत्तर देत आहेत. तर दुसरीकडे 'पीस' अर्थात शांती इतकी एकच प्रतिक्रिया आमदार बोरकर यांनी दिली आहे. मतदारसंघातही त्यांनी नियमितपणे आपले काम सुरुच ठेवले आहे.
आमसभा बोलवा, वाद मागणी
आरजीत सुरु असलेल्या अंतर्गत मतभेदाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची आमसभा बोलवा. नेत्यांना त्यात चर्चा करुन वाद संपवावा, पक्षाच्या दृष्टीने वाद योग्य नाहीत, वाद चव्हाट्यावर नको, अशी मागणी आरजीचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांना करीत आहेत. या वादामुळे पक्षाच्या भविष्याबाबतही आता त्यांना चिंता सतावू लागली आहे.
कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद
दुसरीकडे आरजी नेते अजय खोलकर यांचीही एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. आझाद मैदान पुन्हा बोलावत असून ३९-अ विरोधातील आंदोलन पुन्हा लोडींग अशा आशयाची ही पोस्ट असून त्याला मनोज यांनी आम्ही येतोय, तयार रहा, असे म्हणत प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बोरकर यांना वगळून मनोज व त्यांचे समर्थक एकादे मोठे आंदोलन नजिकच्या काळात करु शकतात काय? असा कयास लावला जात आहे. आरजीतील सोशल मीडियावर रंगलेले हे वाक् युध्द चर्चेचा विषय बनला आहे.
Web Summary : RG leader Manoj Parab's social media post, hinting at upcoming action, has stirred controversy within the party. This follows disagreements with MLA Veeresh Borkar, leading to a public exchange on social media. Party members are calling for a meeting to resolve the internal conflict, fearing for the party's future.
Web Summary : आरजी नेता मनोज परब के सोशल मीडिया पोस्ट, जिसमें आगामी कार्रवाई का संकेत दिया गया है, ने पार्टी के भीतर विवाद खड़ा कर दिया है। यह विधायक वीरेश बोरकर के साथ असहमति के बाद हुआ है, जिससे सोशल मीडिया पर सार्वजनिक आदान-प्रदान हुआ। पार्टी सदस्य आंतरिक संघर्ष को हल करने के लिए बैठक बुलाने की मांग कर रहे हैं, पार्टी के भविष्य के लिए डर रहे हैं।