शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

''इस्पितळासाठीचे खासगी सहभाग सूत्र हे केंद्राच्या मान्यतेनुसारच''

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 7:29 PM

दक्षिण गोव्यातील नवे हॉस्पिसियो इस्पितळ चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी नव्या खासगी मेडिकल कॉलेजची आणि सार्वजनिक खासगी भागीदारीचे (पीपीपी) सूत्र स्वीकारण्याची गरज आहे.

पणजी : दक्षिण गोव्यातील नवे हॉस्पिसियो इस्पितळ चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी नव्या खासगी मेडिकल कॉलेजची आणि सार्वजनिक खासगी भागीदारीचे (पीपीपी) सूत्र स्वीकारण्याची गरज आहे. नवे पीपीपी सूत्र राज्य सरकारने ठरविलेले नाही, तर केंद्र सरकारने निश्चित केले असून, त्यास नीती आयोगाचीही मान्यता आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच काँग्रेसला जर हे मॉडेल मान्य नसेल तर त्या पक्षाने त्याविरुद्ध न्यायालयात जावे, असाही सल्ला मंत्री राणे यांनी दिला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अगोदर विषय समजून घ्यावा. कोणतेही इस्पितळ असो, ते चालविण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. सार्वजनिक खासगी सहभागातून (पीपीपी) तज्ज्ञांचा समावेश इस्पितळाच्या काही सेवांमध्ये होत असतो. पीपीपी सूत्र स्वीकारले म्हणजे राज्य सरकारला वाट्टेल ते काहीही करता येत नाही. मी कोणताही निर्णय घेतला तरी, तो शेवटी मंत्रिमंडळासमोर जावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने ठरविलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच काही सेवांचे खासगीकरण करता येते. मला याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही पत्र पाठविले असून, त्यांनी पीपीपी तत्त्वावर दक्षिण गोव्याच्या इस्पितळाशी निगडीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे, असे राणे यांनी सांगितले.हॉस्पिसियो इस्पितळाला जोडून खासगी वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिल्यास त्याचा लाभ सासष्टीला व दक्षिण गोव्याला होणार आहे. काँग्रेसला जर यात गैरकारभार दिसत असेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी न्यायालयात जावे. राज्यात काँग्रेसची अवस्था सध्या खूप वाईट झालेली आहे. आपले वडील प्रतापसिंग राणे यांच्या नावाचा वापर चोडणकर हे स्वसंरक्षणासाठी करतात व माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे राज्यात काँग्रेस पक्ष कधीच सत्तेवर येणार नाही, असेही मंत्री राणे म्हणाले.