Daily Top 2Weekly Top 5

'इंडिगो'कडून सहा मार्गावरील विमानसेवेत कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 07:51 IST

रविवारपासून ही कपात लागू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशातील प्रमुख विमान कंपनी 'इंडिगो' ने गोव्यातून सहा शहरांमधील विमानसेवेत कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एकूण ३२ साप्ताहिक उड्डाणे कमी होणार आहेत. रविवारपासून ही कपात लागू झाली आहे.

मोपा विमानतळावरून सूरतला आठवड्यातून १ उड्डाण, राजकोटला आठवड्यातून ७ उड्डाणे, वडोदराला आठवड्यातून ७ उड्डाणे, चंदिगढला आठवड्यातून ७ उड्डाणे, भुवनेश्वरला आठवड्यातून ३ उड्डाणे तसेच दाबोळी विमानतळावरून भोपाळसाठीची आठवड्यातील ७ उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. 

या निर्णयामुळे प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे. पर्यटन क्षेत्रावरही याचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
 

English
हिंदी सारांश
Web Title : IndiGo Cuts Flights on Six Routes from Goa

Web Summary : IndiGo significantly reduces Goa flight services, impacting six cities. Thirty-two weekly flights are canceled from Dabolim and Mopa airports, affecting Surat, Rajkot, Vadodara, Chandigarh, Bhubaneswar, and Bhopal. Passengers face disruption; tourism could be affected.
टॅग्स :गोवाइंडिगोट्रॅव्हल टिप्सपर्यटन