शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

CoronaVirus: गोव्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण सापडले; 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 4:57 PM

पुणेच्या प्रयोगशाळेतून गोव्यातील एकूण सोळा संशयितांचे अहवाल आले. त्यापैकी चौदा अहवाल नकारार्थी आहेत.

पणजी : गोव्यात कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी दोन रुग्ण रविवारी सापडले. यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पाच झाली.

पुणेच्या प्रयोगशाळेतून गोव्यातील एकूण सोळा संशयितांचे अहवाल आले. त्यापैकी चौदा अहवाल नकारार्थी आहेत. त्यांना करोनाची लागण झालेली नाही.जे दोघे पॉझिटीव्ह सापडले आहेत, त्यातील एकटा हा बहामास देशातून गोव्यात येतानाच कोरोना विषाणू घेऊन आला. दुसरा रुग्ण हा गोव्यात पूर्वी सापडलेल्या तीनपैकी एका रुग्णाचा नातेवाईक आहे. अजून गोव्यातील 56 संशयीतांचे वैद्यकीय अहवाल मुंबईच्या प्रयोग शाळेतून येणे बाकी आहे. गोव्याची आरोग्य यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे. सहाशे व्यक्तींना निगराणीखाली ठेवता येईल अशी व्यवस्था गोवा सरकार करत आहे. नौदल व लष्कराचेही छोटे इस्पितळ वापरासाठी घेण्याचा सरकारचा विचार आहे. 

दरम्यान ,  बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात उपचार घेणार्‍या 68 वर्षीय ज्या महिलेचा मृत्यू रविवारी पहाटे झाला होता, त्या महिलेचाही अहवाल आला.  तो नकारार्थी आहे. त्या महिलेने गोव्याबाहेर प्रवास केला नव्हता. कोरोनाच्या दृष्टीकोनातून तिची वैद्यकीय चाचणी केली गेली होती.68 वर्षीय महिलेला श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. ती कोरोना संशयीत होती. अहवाल नकारार्थी आल्याने तिचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही हे स्पष्ट झाले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा