शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

Coronavirus News: 'या' राज्यात रेस्टॉरंट्स 1 जूनपासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 5:08 PM

Coronavirus News: अशा प्रकारची पद्धत लागू करून रेस्टॉरंट्स सुरू करण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत अनुकूल आहेत.

पणजी : गोव्यात येत्या 1 जूनपासून सगळी रेस्टॉरंट्स सुरू करावीत, असा सरकारचा विचार आहे. राज्य सरकार स्वत:ची एसओपी तथा प्रक्रिया येत्या 30 रोजी तयार करील व  1 जूनपासून रेस्टॉरंट्स सुरू करण्यास मान्यता देईल. फक्त रेस्टॉरंटमध्ये सामाजिक अंतराची अट पाळावी लागेल. अशा प्रकारची पद्धत लागू करून रेस्टॉरंट्स सुरू करण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत अनुकूल आहेत.मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी रेस्टॉरंट्स व बार देखील सुरू करण्याबाबत सहमती दाखवली आहे. सगळे व्यवहार राज्यात सुरू होत आहेत. अशावेळी रेस्टॉरंट्स सुरू करण्यासही मान्यता द्यावी अशी विनंती मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्री सावंत यांना केली होती. मुख्यमंत्री त्यासाठी तयार झाले. लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या 30 मे रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर राज्य सरकार स्वत:ची एसओपी लागू करून रेस्टॉरंट्स व बारही सुरू करण्यास मान्यता देईल, मुख्यमंत्र्यांनी तसे आश्वासन दिले असल्याचे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले.जर आम्ही बार व रेस्टॉरंट्स सुरू करू दिले नाही तर गोव्यात बेरोजगारी आणखी वाढेल. बेकारीत भर पडेल. यावर उपाय म्हणून आम्ही रेस्टॉरंट्स प्रथम सुरू करण्यासाठी देणार आहोत. रेस्टॉरंटमध्ये अनेकांना नव्याने काम करण्याची संधी मिळेल. रेस्टॉरंटच्या मालकांनाही दिलासा मिळेल. याचप्रमाणो राज्यातील चहाची छोटी हॉटेल्स देखील सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली असल्याचे लोबो यांनी सांगितले. तारांकित हॉटेल्स सुरू करायची की नाही ते केंद्रीय गृह मंत्रालय ठरवील. त्याविषयीचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, असे मंत्री लोबो म्हणाले. टुरिस्ट टॅक्सी, रेन्ट अ कार, बाईक, वॉटर स्पोर्टस व्यावसायिक यांचे विविध परवाने नूतनीकरण करण्याची मुदत टळून गेली, पण त्यांना दंड ठोठावला जाणार नाही. त्यांना मुदतीनंतरही परवान्यांचे नूतनीकरण करू दिले जाईल. सरकारने तशी सूचना वाहतूक खात्याला केल्याचे लोबो यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या