शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

CoronaVirus News : गोव्यात दर 24 तासांत 84 कोविडग्रस्त ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 4:59 PM

राज्यात रोज सरासरी 2 हजार 200 व्यक्तींच्या कोविड चाचण्या केल्या जातात. आतापर्यंत एकूण 1 लाख 36 हजारहून जास्त व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे गेल्या दहा दिवसांत एकूण 2 हजार 11 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले.

पणजी : राज्यात दर चोवीस तासांत 84 कोविडग्रस्त आजारातून बरे होतात असे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या दहा दिवसांत एकूण 2 हजार 11 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. त्यांची स्थिती सुधारली. आतापर्यंत कोविडमुळे 55 व्यक्तींचे बळी गेले ही मात्र मोठ्या चिंतेची गोष्ट गोव्यात झाली आहे. तीन प्रकरणी मृतदेहांची शवचिकित्सा केल्यानंतर त्या व्यक्तीला कोविड होता हे स्पष्ट झाले.

राज्यात रोज सरासरी 2 हजार 200 व्यक्तींच्या कोविड चाचण्या केल्या जातात. आतापर्यंत एकूण 1 लाख 36 हजारहून जास्त व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींची संख्या सुमारे सात हजार आहे. मात्र, या सात हजारांपैकी सुमारे पाच हजार व्यक्ती कोविडमुक्त झाल्या. उर्वरित व्यक्तींपैकी काही जणांवर कोविड इस्पितळात उपचार सुरू आहेत तर काहीजण कोविड निगा केंद्रामध्ये आहेत. सुमारे दीडशे व्यक्ती घरीच क्वारंटाईन झाल्या आहेत.

पंचावन्न व्यक्तींचा उपचारा दरम्यान बळी गेला. यात चाळीस व पन्नास वर्षाहून कमी वयाचेही काही रुग्ण असल्याने स्थिती चिंताजनक मानली जात आहे. जे 55 रुग्ण आतार्पयत दगावले, त्यातील सुमारे 35 एका मुरगाव तालुक्यातील आहेत. आठजण सासष्टी तालुक्यातील आहेत. काहीजण बार्देश व काहीजण तिसवाडीतील आहेत. सत्तरी तालुक्यात दोघांचे, सांगेत एकाचा व फोंडा तालुक्यातही एकाचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील सुमारे साठ जागा अशा आहेत, जिथे कोविडचे रुग्ण आढळले. काही ठिकाणी केवळ एकच व्यक्ती कोविडग्रस्त आढळली. सर्वाधिक समस्या निर्माण झाली ती वास्को रुग्णालयाच्या क्षेत्रत व कुठ्ठाळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत. तसेच चिंबल, साखळी, मडगावच्या आरोग्य केंद्रांच्या तथा रुग्णालयांच्या क्षेत्रतही जास्त कोविडग्रस्त आढळले. कोलवाळ, म्हापसा व पणजी रुग्णालयांच्या क्षेत्रतही कोविडग्रस्तांची संख्या वाढली.

आल्तिनो येथे युवकाचा मृत्यू दरम्यान, पणजीतील आल्तिनो येथील एका 29 वर्षीय युवकाचा मंगळवारी पहाटे कोविडमुळे मृत्यू होण्याची खळबळजनक घटना घडली. पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दोन दिवसांपूर्वी या युवकाला मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याला मरण आले. यामुळे पणजीत दु:ख व्यक्त होत आहे. पणजीत आतार्पयत कोविडग्रस्तांची एकूण संख्या 79 झाली आहे. आल्तिनो येथे कोविडचा फैलाव झालेला नाही पण तेथील युवकाचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये काहीशी भीती पसरली.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या