शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

सीएएचा परिणाम जिल्हा पंचायत निवडणुकीवर नाही- सदानंद तानावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 7:45 PM

सीएए कायद्यामुळे गोव्यात भाजपा विरोधी लोकमत तयार झाले आहे, असे जे चित्र रंगवले आहे.

मडगाव: सीएए कायद्यामुळे गोव्यात भाजपा विरोधी लोकमत तयार झाले आहे, असे जे चित्र रंगवले आहे ते खरे नसून गोव्यातील जनतेने या कायद्याला समर्थनच दिले आहे, असे मत भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त करतानाच जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीवर या मुद्द्याचा काहीच परिणाम होणार नाही, असे मत व्यक्त केले.सोमवारी मडगावात भाजपाची दक्षिण गोवा कार्यकारिणी जाहीर करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले, या कायद्याच्या समर्थनासाठी भाजपाने रॅली आयोजित केली होती. त्या रॅलीला आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला होता. यावरुन गोव्याच्या जनतेचा कल कुणीकडे आहे हे स्पष्ट होते. जिल्हा पंचायत निवडणुकात दोन्हीकडे भाजपाचीच सत्ता येणार याची खात्री आम्हाला आहे, असे ते म्हणाले. सीएए कायदा संसदेत संमत झाला आहे. संसदेत संमत झालेला कायदा बदलता येत नाही याची पूर्ण जाणीव असतानाही सीएए विरोधी सभेला गोवा विधानसभेचे पाच आमदार उपस्थित रहातात ही दूर्दैवी बाब आहे. इतरांना कायद्याचे ज्ञान नाही, असे म्हणता येईल. मात्र आमदारानाही कायद्याचे ज्ञान नाही का असा सवाल त्यांनी केला.यावेळी तुळशीदास नाईक यांच्या अध्यक्षतेखालील ४६ सभासदांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात उपाध्यक्ष म्हणून दीपक नाईक बोरकर, संतोष केरकर, लियो रॉड्रीगीस, महेश नाईक, सरचिटणीस म्हणून सुरेश केपेकर, विशाल शाबू देसाई, सत्यविजय नाईक, सचिवपदी समीरा कार्दोज, गणपत नाईक, गणेश वेळीप, गौरी शिरोडकर, रजनी नाईक तर खजिनदारपदी राजीव सुखठणकर यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी आमदार दामू नाईक,माजी खासदार नरेंद्र सावईकर, अल्पसंख्याक विभागाचे शेख जीना हे उपस्थित होते.या कार्यकारिणीचे सदस्य खालील प्रमाणे- दिगंबर जल्मी, रजनी गावकर, सुभाष नाईक, नागेश चितारी, हेजल फर्नाडीस, भूषण प्रभूगावकर, खूषाली परवार,विनय तारी, जेम्स परैरा, विश्वनाथ दळवी, तुळशीदास नाईक, राजेंद्र बिचोलकर, योगेश खांडेपारकर, अरुण फळदेसाई, सुबोध गोवेकर, रंजीता पै, दामोदर नाईक, अशोक नाईक, अनिता गावडे, दुर्गादास प्रभू, गोडफ्रे कुरैय, लविना रॉड्रीगीस, जॉर्जीना गामा, रमाकांत गावकर, नॉयला रॉड्रीगीस, दिक्षा तांबोसकर, सावियो पायस, मिंगेलीना वेलो, पिरीस डिकॉस्ता, संदीप फळदेसाई, गणेश लमाणी व शैलेश तिवारी.