शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मुक्या मुलीसमोर आई-वडिलांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 4:56 PM

काहीच हालचाल होत नाही तरीही त्यांचा हा प्रकार थांबत नाही. वृत्तवाहिन्यांमध्ये असे चित्र हमखास पहावयास मिळते.ती घटना भारतातल्या कुठल्यातरी भागात घडलेली असते.

फोंडा : माणूस खाली पडलेला आहे... मारहाण करणारे त्याला लाठीकाठीने बेदम मारताहेत... त्याला वाचवायला त्याची बायको येथे तिलापण डोके फुटेपर्यंत मारहाण करण्यात येते.... दोघेही मारहाणीमुळे अर्धमेले होऊन खाली पडतात. तरी हे मारहाण करणारे त्यांना दंडुक्याने मारहाण करत राहतात. काहीच हालचाल होत नाही तरीही त्यांचा हा प्रकार थांबत नाही. वृत्तवाहिन्यांमध्ये असे चित्र हमखास पहावयास मिळते.ती घटना भारतातल्या कुठल्यातरी भागात घडलेली असते. असले काहीसे चित्र शांतताप्रिय गोव्यात घडले तर तुमचा विश्वास बसेल...? परंतु नेमकी अशीच एक घटना मडकई-फोंडा येथे घडली असून, संपूर्ण मारहाण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाल्यानेच मारहाण करणाऱ्यांना आता पळताभुई थोडी झाली आहे.खºया गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाºया पोलिसांचा कामचुकारपणा उघड झाला आहे. तर दोषीवर वरदहस्त ठेवणाºया काही राज्यकर्त्यांचे पितळही उघड पडले आहे. प्राप्त माहितीनुसार, पारंपई -मडकई येथील देवदत्त नाईक व सदानंद नाईक यांच्यामध्ये काही वर्षे मालमत्तेवरून वाद चालू आहे. त्यांच्यामध्ये वारंवार शाब्दिक चकमकी उडतात. कधी कधी प्रकरण देवदत्त याला मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. सहा जून रोजी याच जुन्या वादाचे पर्यवसान अमानुष मारहाण करण्यापर्यंत गेले. सदानंद नाईक, सुनंदा नाईक, भालचंद्र नाईक, सिद्धार्थ नाईक व सोमनाथ नाईक यांनी सदानंद व त्याच्या पत्नीला दंडुके व लोखंडी अवजारांनी अमानुष मारहाण सुरू केली. सदानंदला जखमी करून अर्धमेल्या अवस्थेत सोडल्यानंतर, हल्लेखोरांनी त्याची पत्नी सुनिता नाईक यांनासुद्धा मिळेल त्या अवजाराने मारण्यास सुरुवात केली. दाम्पत्याची एक मुलगी मुकी आहे. आई-बाबांना मारहाण होताना बघून ती मदतीसाठी शेजाºयांकडे धावली. शेजारी आल्यानंतर त्यांनी तिथून काढता पाय घेतला. लोक आले नसते तर कदाचित या दोघांचा बळी घेऊनच हे लोक थांबले असते. सीसीटीव्हीमधले दृश्य बघून मारहाण करणाºयांची चीड येऊन थरकाप उडतो.>सीसीटीव्हीमुळे सत्य उघडकीस...नाईक दाम्पत्याला रक्तबंबाळ करून अर्धमेल्या अवस्थेत सोडल्यानंतर मारहाण करणाºयांनी राजकीय गॉडफादरच्या जोरावर पोलीस ठाणे गाठले व अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या देवदत्त नाईक व त्याच्या पत्नीवर मारहाणीची तक्रार दाखल केली.पोलिसांनी हे चोर सोडून संन्याशाला फासावर लटकण्यासाठी सर्व तयारी केली होती. आरोग्य यंत्रणेने पण राजकीय व्यक्तीला हवी तशीच व्यवस्था केली होती. त्यावेळी कुणालाच माहीत नव्हते की देवदत्त नाईकने आपल्या झोपडीवजा घरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवली होती. मारहाणीचे संपूर्ण रेकॉर्डिंग झाल्याने त्यांना पाठीशी घालणाºया सगळ्यांचे धाबे दणाणले. जास्त नाचक्की झाली ती पोलिसांची. ज्यांना ते पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या शोधार्थ, आता ते फिरत आहेत. कारण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.दररोजच्या वादातून सदानंद व त्याचे कुटुंबीय कधीतरी आपल्यावर जीवघेणा हल्ला करतील या भीतीने देवदत्त याने सीसीटीव्ही यंत्रणा बसवली होती, ती आज त्याला निर्दोष सिद्ध करायला पुरेशी होऊ शकते. अन्यथा अमानुष मारहाण सोसूनही त्याला पोलिसांनी हॉस्पिटलमधून थेट कोठडीत पोहोचवले असते. सरकारी वकील सत्यवान देसाई यांचा जोरदार युक्तिवादही या लोकांच्या अमानुष हत्येचा बुरखा पाडण्यास कारणीभूत ठरला.