Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावर धावणार अहमदाबाद-मंगळुरु विशेष गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 12:44 IST

कोकण रेल्वे मार्गावर आता अहमदाबाद ते मंगळुरू साप्ताहिक स्पेशल रेल्वे धावणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कोकण रेल्वे मार्गावर आता अहमदाबाद ते मंगळुरू साप्ताहिक स्पेशल रेल्वे धावणार आहे. गाडी क्रमांक ०९४२४ ही गाडी अहमदाबादहून या महिन्याच्या शुक्रवारी दि.९,१६ व २३ रोजी संध्याकाळी ४ सुटेल व दुसऱ्या दिवशी मंगळुरू येथे संध्याकाळी ७:४० वाजता पोहचेल.

तर गाडी क्रमांक ०९४२३ ही या महिन्याच्या शनिवारी दि. १०,१७ व २४ रोजी मंगळुरू येथून रात्री ९:१० वा. वाजता सुटून, तिसऱ्या दिवशी १:१५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचणार आहे. या गाडीला २२ डबे आहेत. नदियाद आनंद, वडोदरा, भारूच, सुरत, वापी, वसईरोड, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमली, मडगाव, कारवार, उडुपी व सुरतकल येथे ही रेल्वे थांबा घेईल. या साप्ताहित गाडीमुळे थेट गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठ्या सोयिचे ठरणार आहे.

 

टॅग्स :गोवाकोकण रेल्वे