Join us

होय, तिला मी डेट करतोय, पण... - अरबाज खान

By admin | Updated: March 30, 2017 16:21 IST

मलायकासोबत काडीमोड घेतल्यानंतर अरबाज खान सध्या प्रेमात पडला आहे. नुकतेच त्याने मुलाखतीमध्ये डेटिंग करत असल्याची कबुली दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 - 18 वर्षानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. मलायकासोबत काडीमोड घेतल्यानंतर अरबाज खान सध्या प्रेमात पडला आहे. नुकतेच त्याने ‘डिएनए’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये डेटिंग करत असल्याची कबुली दिली आहे. 
तुझ्या डेटिंगबद्दल अनेक चर्चा ऐकायला येत आहेत, यात काही तथ्य आहे का? असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला. यावर अरबाजने कुठलेही आढेवेढे न घेता, सगळे सांगून टाकले.डेट? कुणाला? येलोला म्हणत असाल तर ती माझी केवळ एक चांगली मैत्रिण आहे, एवढेच मी सांगेल. मी जेव्हा केव्हा गोव्यात जातो, तिला भेटतो. ती एका रेस्टॉरंटची मालक आहे, असे तो म्हणाला. 
ही यॅलो रोमानियाची राहणारी आहे का? असा प्रश्न यानंतर अरबाजला विचारला गेला. यावर अरबाज जे बोलला ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. नाही, ती वेगळी आहे. तिचे नाव अलेक्झेंड्रिया आहे. ती माझी मैत्रिण आहे. मी तिच्यासोबत डेट करतोय का? असे विचाराल तर होय, मी डेट करतोय. पण आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये नाही. असे व्हायला अद्याप बराच वेळ आहे, असे अरबाज म्हणाला. 
एकंदर काय, तर अरबाजच्या आयुष्यात एका रोमानियन ब्युटीची एन्ट्री झाली आहे.  अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. यानंतर या घटस्फोटामागच्या कारणांची चर्चा सुरु झाली. अरबाजचे मन कुण्या दुसऱ्या लेडीवर आल्याचे बोलले गेले.