Join us  

जस्टीन बीबरकडे असं काय आहे, जे आजच्या अनेक पुरुषांकडे नाही?

By admin | Published: May 10, 2017 4:33 PM

जस्टीनकडे आहेत अशा ४ गोष्टी, ज्यातली एकही अनेक पुरुषांकडे नसते!

नेहा चढ्ढा/ ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - जस्टीन बीबर, त्याच्या दिवान्यांचे चर्चे काय सांगायचे? त्यातही जगभरातल्या मुली त्याच्यासाठी पागल झालेल्या आहेत. त्याच्या लव्ह लाईफचे चर्चेही गाजतात, आणि त्याच्या व्हिडीओमधल्या रोमान्स आणि विरहाची इण्टेसिटीही अनेकांना आपली वाटते. पण त्यापलकिडे जगभरात मुलीच नाही तर मुलंही त्याचे दिवाने आहेत, करोडो त्याचे चाहते आहेत, ते का? असं काय आहे जस्टीन बीबरकडे जे आजच्या अनेक पुरुषांकडे अजिबात नाही? अशा कुठल्या ४ गोष्टी जस्टीनकडे आहेत ज्यातली एकही गोष्ट अनेक पुरुषांना धड जमत नाही. आणि कशामुळे जस्टीनच्या ‘पुरुषी’ पर्सनॅलिटीतही स्त्री-पुरुष दोघांना भूरळ घालण्याची जादू येते?

पैसा तर जस्टीनकडे आहेच, वय वर्षे २३. पैसा काय वाट्टेल ते कमावू शकतो, लोकप्रिय व्हायला मदत करू शकतो याच काहीच शंका नाही. पण जगभरातल्या तरुण जगाला दिवानं करेल इतकी ताकद केवळ पैशात नाही, त्याचं काही सिक्रेट जस्टीनने बनवलेल्या स्वत:च्या पर्सनॅलिटीतही आहे. म्हणूनच त्याच्याकडे आहेत अशा ४ गोष्टी ज्या अनेक पुरुषांकडे अजिबात नसतात.

अ‍ॅटिट्यूड

जस्टीनकडे रंगरुप आहेच, तो देखणा आहे, तरुण आहे. मात्र त्यासोबत आहे त्याच्याकडे अ‍ॅटिट्यूड. तो बोलतो, गातो, चालतो, इतकंच काय गप्प बसलेला असतो तेव्हाही त्याच्यावरुन नजर हटत नाही. रंगरुपापलिकडे त्याचे डोळे बोलतात. त्याच्या चेहऱ्यावरचा गो गेटर अ‍ॅटिट्यूड आणि नजरेतली धमक हे त्याचं खरं बलस्थान. अनेक पुरुषांना हेच जमत नाही. काहींकडे अ‍ॅटिट्यूड नसतो, काही ज्याला अ‍ॅटिटयूड समजात तो अ‍ॅरोगन्स अर्थात उद्धटपणा असतो. आणि मग ते फारसे कुणाला आवडत नाहीत. 

प्यार का इझहार, खुलेआम - ही गोष्ट किती लोकांना जमते? जस्टीनचे व्हीडीओच तर काय अफाट. त्यातलं प्रेमाचं एक्सप्रेशन गजब. आणि व्यक्तिगत आयुष्यातही त्यानं आपली प्रेमप्रकरण कधी लपवली नाहीत. त्याउलट अनेक पुरुषांना जाहीर तर सोडाच जिच्यावर प्रेम आहे, तिच्याकडेही आपलं प्रेम व्यक्त करता येत नाही. बाकी अन्य नात्यांमध्येही त्यांच्या बोलण्यात कोरडेपणाच असतो. ते प्रेमानं बोलणं पुरुषी समजत नाहीत. इथंच सारं चुकतं. 

फॅशनच मॅनली गणित -पुरुषी फॅशन नावाची एक अत्यंत पिंजऱ्यात बांधलेली गोष्ट आहे. जस्टीनने तीच मोडून टाकली. तो मुंबईत आला तेच गुलाबी रंगाची हुडी घालून. वयात येणारी मुलं तरी गुलाबी रंगाचे कपडे घालतात का? तो मुलींचा रंग असं म्हणून ते तो रंगच नाकारतात. मोठा गुन्हाच गुलाबी रंग म्हणजे. जस्टीनने तेच मोडीत काढलं. तो पिवळे, गुलाबी, निळया रंगाचे कपडे घालतो. मोठ्ठे हॅरी पॉटर स्टाईलचे चष्मे कॉन्सर्टमध्ये घालतो. त्यानं स्वत:चं मॅनली गणित तयार केलं. अनेक पुरुषांना कुठं जमतं असं स्टिरिओटाईप तोडणं. 

म्युझिकल, लिरीकल - आता हे जरा अवघड आहे. जस्टीन ला जमतं तेवढं म्युझिक सगळ्यांनाच कसं जमावं? नाहीच जमत? पण म्युझिक आवडणं वेगळं, स्वत: गाणं वेगळं. अनेकजण ऐकतात उत्तम. पण चुकून कधी गुणगुणत नाहीत. ते स्वत:साठी गाणं, त्यात हरवून जाणं अनेकांना जमत नाही. आपल्या थोर्थोर हिंदी सिनेमानं किती वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय, गाना आए या ना आए, गाना चाहिए!