Join us

सिद्धार्थ वाढवतोय वजन

By admin | Updated: August 9, 2014 23:37 IST

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्र अतिशय कमी काळात यशस्वी ठरला आहे. त्याच्या द विलेन या चित्रपटाने 1क्क् कोटींचा व्यवसाय केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्र अतिशय कमी काळात यशस्वी ठरला आहे. त्याच्या द विलेन या चित्रपटाने 1क्क् कोटींचा व्यवसाय केला आहे. तेव्हापासून त्याच्याकडे अतिशय चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. नुकतेच सिद्धार्थने द वॉरियर या हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक साईन केला आहे. या चित्रपटासाठी त्याला आठ किलो वजन वाढवावे लागणार आहे. त्यासाठी त्याच्याक डे सहा आठवडय़ांचा वेळ आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तो या चित्रपटासाठी मार्शल आर्ट शिकतो आहे. सिद्धार्थ नियमित जिमला जात असून प्रोटीनयुक्त आहारही घेत आहे. या चित्रपटात तो एका फायटरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात सिद्धार्थसोबत अक्षय कुमारही मुख्य भूमिकेत असून तो सिद्धार्थच्या मोठय़ा भावाच्या भूमिकेत आहे. अभिनेते ज्ॉकी श्रॉफ चित्रपटात दारुडय़ा बापाच्या भूमिकेत दिसतील.