बॉलिवूडमधील पहिला डान्सिंग स्टार किंवा जंपिंग जैक म्हटले जाणारे अभिनेते म्हणजे जितेंद्र.
हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास सुरु झाला तो ज्युनिअर आर्टिस्ट एक्स्ट्रा म्हणून आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्टारपदापर्यंत मजल मारली.
जितेंद्र यांनी आपल्या करियरमध्ये त्यात 'मेरे हुजूर',' खिलौना', 'हमजोली', 'कारवां',' जैसे को तैसा', 'परिचय', 'खुशबू और किनारा', 'नागीन',' धरमवीर', 'कर्मयोगी', 'जानीदुश्मन' असे जवळपास २५० सिनेमे केले.
जितेंद्र यांचा जन्म ७ एप्रिल १९४२ ला अमृतसर पंजाब येथे झाला.
जन्माच्या वेळी नाव ठेवलं गेलं रवि (रवि कपूर). मात्र, चित्रपटसृष्टीत त्यांना जितूजी या नावाने ओळखलं जातं.
२००३ मध्ये जितेंद्र यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल फिल्मफेअर लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवार्ड दिले गेले.
तर २००७ मध्ये दादासाहेब फाळके अॅकेडमी पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला.