पहिली कमाई ५० रुपये, आता 'Tv'ची महागडी अभिनेत्री!

मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अपयश तर स्वीकारलं पण त्याचबरोबर मेहनतीने स्वतः चं इंडस्ट्रीत स्थान निर्माण केलं. 

असंच एक नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली गांगुली.

छोट्या पडद्यावरील अनुपमा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

या मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली.

मीडिया रिपोर्टनुसार, रुपाली ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. 

जेव्हा अभिनेत्रीचं कुटुंब आर्थिक संकटातून जात होतं, तेव्हा ती ५० रुपये कमवण्यासाठी १५ किमी चालत असे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका  मुलाखतीत केला होता.

रुपाली सुरुवातीला एका दिवसासाठी १ लाख ५० हजार रुपये मानधन घेत होती. 

आता ती एका दिवसासाठी ३ लाख रुपये मानधन म्हणून घेते. 

मुंबईच्या 'या' कॉलेजमध्ये शिकलीये सोनाली बेंद्रे!

Click Here