दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीची क्वीन म्हणून अभिनेत्री तृषा कृष्णनला ओळखलं जातं.
४ मे १९८३ ला चेन्नईमध्ये जन्मलेल्या या सुंदर अभिनेत्रीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील जवळपास प्रत्येक भाषेतील चित्रपटात काम केलंय.
तृषाचे वडील कृष्णन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महाव्यवस्थापक होते. ऑक्टोबर २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं.
तृषाच्या आईचे नाव उमा कृष्णन असून तृषा अनेकदा तिच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
तृषाने आपलं प्रारंभिक शिक्षण सेक्रेड हार्ट स्कूल चर्च पार्क चेन्नई येथून केलं, त्यानंतर तिने चेन्नईच्या इथिराज कॉलेज ऑफ वुमनमधून बीबीएमध्ये पदवी पूर्ण केली.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तृषा कृष्णनने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचे ठरविलं.१९९९ मध्ये ती अनेक टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये दिसली.
'जोडी' या चित्रपटात तिने पहिल्यांदा सहाय्यक भूमिकेत काम करत चाहत्यांची मनं जिंकली. तिने आजवर अनेक लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर स्क्रिन शेअर केली आहे.
ज्ञानदा व हर्षदच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण पाहिलेत का?