लोकप्रिय मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि हर्षद आत्माराम यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.
८ मे २०२६ रोजी या जोडीनं आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
या खास दिवसाचे क्षण ज्ञानदा आणि हर्षदने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
लग्नासाठी वधू ज्ञानदाने अतिशय सुंदर साडी परिधान केली होती,हर्षदनेही त्याला साजेसा लूक केला होता.
सध्या सोशल मीडियावर ज्ञानदाच्या लग्नातील उखाण्याची देखील जोरदार चर्चा आहे.
हर्षद आणि ज्ञानदाचा विवाहसोहळा आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.