उत्तम अभिनय आणि साधेपणा यामुळे रश्मिका कायमच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असते.
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना.
आजवर रश्मिकाने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे छावा.
अभिनेता विकी कौशलसोबत रश्मिकाने छावा या सिनेमात स्क्रीन शेअर केली होती.
अलिकडेच रश्मिकाने छावा सिनेमातील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये रश्मिका मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. नाकात नथ, कपाळावर कुंकू, नऊवारी साडी असा तिचा लूक लोकप्रिय होत आहे.
छावा सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रश्मिकाने हे फोटो शेअर केले आहेत.