OTT वर दर आठवड्याला काही ना काही नवं येत राहतं, पण प्रश्न असतो तो फक्त एकच नेमकं काय पाहावं?
तर या आठवड्यात तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सर्वोत्तम फिल्म्स आणि सीरिजची संपूर्ण यादी.
विजय वर्माची मटका किंग ही सीरिज सध्या चर्चेत आहे.नागराज मंजुळेंच्या या सीरिजमध्ये विजय एका चतूर कापूस व्यवसायाच्या भूमिकेत आहे.
ही बहुचर्चित सीरिज १७ एप्रिल रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे.
पवन कल्याणचा 'उस्ताद भगत सिंग' हा चित्रपट १६ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे, त्यामुळे तुम्ही या वीकेंडला हा सिनेमा पाहू शकता.
'दो दिवाने शहर में' हा या वर्षी रिलीज झालेला हिंदी रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत.
हा चित्रपट देखील १७ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा स्टार 'टोस्टर' हा एक कॉमेडी चित्रपट असून हा चित्रपट १५ एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.