मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे रुपाली भोसले.
आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने मराठीसह हिंदी कलाविश्वातही वेगळं स्थान निर्माण केलंय.
मात्र, 'आई कुठे काय करते' या मालिकने तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली.
सध्या रुपाली लपंडाव या मालिकेत काम करताना दिसत आहे.
पण, तुम्हाला माहिती आहे का ही लोकप्रिय अभिनेत्री किती शिकली आहे?
रुपाली फक्त नववीपर्यंत शिकली आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या शिक्षणाविषयी खुलासा केला होता.
रुपाली भोसले ही मुंबईकर आहे. सध्याच्या घडीला मालिकाविश्वातील आघाडीच्या नायिकांमध्ये तिची गणना केली जाते.