अलिकडेच हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण' चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला.
या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत कसा दिसणार, याबद्दल मोठी उत्सुकता होती.
अखेर यावरून पडदा उठला असून त्याचं प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतील रुप समोर आलं.
अशातच या सिनेमासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलंय याचीही चर्चा रंगली आहे.
रणबीर कपूर (राम) - टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अभिनेता रणबीर कपूरने या सिनेमाच्या दोन्ही भागांसाठी १५० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
यश (रावण)- नितेश तिवारी यांच्या 'रामायण'मध्ये यश रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या मानधनाबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने दोन्ही भागांसाठी १०० कोटी रुपये फी घेतल्याचं बोललं जातंय.
साई पल्लवी (सीता)- अभिनेत्री साई पल्लवी 'रामायण'मध्ये सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या दोन्ही भागांसाठी तिने १२ कोटी रुपये मानधन आकारल्याचं सांगितलं जातंय.
सनी देओल (हनुमान)- सनी देओल या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असून यासाठी त्याला ४० कोटी रुपये फी मिळाली आहे.
रवि दुबे (लक्ष्मण)- सिनेमात रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याला २ ते ४ कोटी रुपये इतकं मानधन मिळाल्याचं कळतंय.