सिनेइंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी अनेक जण संघर्ष करुन येतात. संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही.
बॉलिवूडमधील अशीच एक अभिनेत्री जिने एकेकाळी कॉफी शॉपमध्ये नोकरी केली.महिन्याच्या खर्चासाठी तिला हे काम करावं लागायचं.
अभिनय क्षेत्रात येताच ती एका रात्रीत बनली सुपरस्टार. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून श्रद्धा कपूर आहे.
श्रद्धाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, बोस्टनमध्ये शिक्षण घेत असताना तिने पॉकेटमनीसाठी कॉफी शॉपमध्ये काम केलं.
आपली निरागसता आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रद्धा कपूरचा भलामोठा चाहतावर्ग आहे.
श्रद्धा कपूरने 'तीन पत्ती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र तिला 'आशिकी-२' या चित्रपटातून खरी ओळख मिळाली.
मिडिया रिपोर्टनुसार, या अभिनेत्रीची एकूण संपत्ती १३० कोटी इतकी आहे. ती एका चित्रपटासाठी ५ कोटी रुपये इतकं मानधन घेते.