पूजा सावंतचा पहिला मराठी चित्रपट कोणता?

मराठी चित्रपट सृष्टीतील एक चमकता चेहरा म्हटलं की अभिनेत्री पूजा सावंतचं नाव डोळ्यासमोर येतं.

२५ जानेवारी १९९० साली पूजाचा जन्म झाला. पूजाचे वडील विलास सावंत यांनी वयाची ३० वर्षे अभिनय क्षेत्रात काम केले आहे तर आई अमृता ह्या एक उत्तम गृहिणी आहेत. 

पूजाच्या वडिलांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केलं आहे. वडिलांकडूनच तिला अभिनयाचा वारसा मिळाला.

पूजा सावंतचं शालेय शिक्षण हे दादरच्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ येथून झालं तर महाविद्यालयीन शिक्षण हे वडाळ्याच्या एम आय ई एस महाविद्यालयातून पूर्ण झालं आहे. 

पूजाला लहानपणापासूनच नृत्याची भयंकर आवड असल्यानं शाळेत आणि महाविद्यालयात असताना तिने अनेक नृत्यस्पर्धा आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली.

२००८ साली पूजाने एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. त्यामध्ये आपल्या प्रखर अभिनय आणि नृत्यकौशल्याने तिने ही स्पर्धा जिंकली.

त्यावेळी सचित पाटील याने पूजाचा अभिनय पाहून तिला आपल्या आगामी ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटासाठी विचारणा केली. 

पूजानेही लगेच होकार कळविला आणि अशा प्रकारे पूजा सावंतचे मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झालं.सध्या पूजा सालबर्डी सिनेमामुळे चर्चेत आहे.

'मुरांबा' मधील रेवाचं शिक्षण किती?

Click Here