'मुरांबा'मधील रेवाचं शिक्षण किती?

मालिकाविश्वात स्वतःच्या मेहनतीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे निशाणी बोरुले.

पडद्यावर खलनायिकेची भूमिका साकारणारी निशाणी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र प्रचंड संघर्षातून पुढे आलेली अभिनेत्री आहे.

छोट्या पडद्यावरील मुरांबा या मालिकेतून निशाणी घराघरात पोहोचली.

या मालिकेत तिने साकारलेलं रेवा नावाचं पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

निशाणी बोरुले ही मुळची पुण्याची आहे. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर तिने त्या क्षेत्रातच नोकरी करावी, अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती.

मात्र, तिने अभिनयाची वाट धरली आणि स्वत:ची एक ओळख निर्माण केली. तिचा हा निर्णय कुटुंबियांना मान्य नव्हता. 

सध्याच्या घडीला निशाणी बोरूले ही मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका आहे.

या वीकेंडला ओटीटीवर पाहा 'हे' दमदार चित्रपट!

Click Here