दर आठवड्याला ओटीटीवर कोणते चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार याकडे सिनेप्रेमीचं लक्ष लागलेलं असतं.
या विकेंडला ओटीटीवर अनेक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
फक्त हॉलिवूड नाहीतर बॉलिवूड चित्रपट देखील या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ओटीटीप्रेमी उत्सुक आहेत.
ओ रोमियो- विशाल भारद्वाज दिग्दर्शित ओ रोमियो हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट २७ मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे.यामध्ये शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरीची प्रमुख भूमिका आहे.
काट्टान- एम. मणिकंदन आणि बी. अजित कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या तमिळ ग्रामीण अॅक्शन-थ्रिलर वेब सीरिजमध्ये विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २७ मार्चपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम करण्यात येणार आहे.
बीटीएस द रिटर्न- कोरिअन पॉप बीटीएस ग्रुपची गोष्ट आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज २७ मार्चला रिलीज होणार आहे.
'डिटेक्टिव होल'- 'डिटेक्टिव होल' ही सीरिज सध्या खूप चर्चेत आहे. ही सीरिज २६ मार्च २०२६ पासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांची लेक, गाजवतेय बॉलिवूड