मृणाल ठाकूर ही मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.
मृणालने बॉलिवूडसह, दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
मृणालने विविध भाषेतील सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी ती कायम आपलं मराठमोळेपण जपत असते.
२०१२ मध्ये ‘मुझे कुछ कहती…ये खामोशियां’ या मालिकेतून तिने करिअरला सुरुवात केली.
मात्र, ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतून ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली.
सध्या मृणाल तिचा आगामी चित्रपट 'डकैत'मुळे चर्चेत आहे.
नुकतंच मृणालने या चित्रपटाच्या निमित्ताने खास फोटोशूट केलं आहे.
चेहऱ्यावर स्मित हास्य आणि हटके पोजमधील तिचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.