माधवी निमकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय नायिका आहे.
माधवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्वप्नांच्या पलीकडले', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली आहे.
सध्या ती 'तुझ्या सोबतीने' मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
माधवी नेहमीच आपल्या फिटनेसकडे काटेकोरपणे लक्ष देते. त्यामुळे तिच्या सौंदर्याची, फिटनेसची सर्वत्र चर्चा होत असते.
एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं.
माधवीला घरगुती जेवणं आवडतं. ती रोज सकाळी उठल्यावर ड्रायफ्रूट खाते किंवा एक दिवस फळे खाते.
तसंच अभिनेत्री गोड पदार्थ खाणंही टाळते. त्याचबरोबर रोज किमान १ तास चाललं पाहिजे, असं देखील माधवी आवर्जुन सांगते.
शिवाय दिवसातून साधारण ३ लिटर तरी पाणी प्यायलं पाहिजे, मी सुद्धा सतत पाणी पिते. चांगली त्वचा आणि फॅटलॉससाठी हे उपयुक्त आहे.