छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा'.
अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि आशुतोष गोखले यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रचंड गाजली.
या मालिकेतील ‘श्वेता’ नावाची नकारात्मक भूमिका साकारून अनघा भगरे घराघऱात पोहोचली.
अनघा ही एक उत्तम अभिनेत्री असून तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
'रंग माझा वेगळा' नंतर अनघा आता नाटक क्षेत्रात सक्रिय झाली आहे.
सध्या रंगभूमीवर तिचं 'शिकायला गेलो एक' हे नाटक जोरदार सुरु आहे.
तसंच ती सोशल मीडियावर देखील आपले विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.